esakal | 'मराठ्यांविरोधी वक्तव्य करणाऱ्या विजय वडेट्टीवारांची हकालपट्टी करा'
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Kranti Morcha

खासदार संभाजीराजे छत्रपती यांची जनतेतील प्रतिमा मलिन करून बदनामी केली जात आहे.

'मराठ्यांविरोधी वक्तव्य करणाऱ्या विजय वडेट्टीवारांची हकालपट्टी करा'

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : बेजबाबदार वक्तव्य करुन सामाजिक शांततेचा भंग होईल, अशी भाषा वापरणारे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना तात्काळ बडतर्फ करा. सतत मराठाविरोधी वक्तव्य करत असल्याबद्दल वडेट्टीवार यांची मराठा आरक्षण उपसमितीवरुन (Maratha Reservation Sub-Committee) हकालपट्टी करावी, अशी मागणी कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या (Karad Taluka Maratha Kranti Morcha) वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलदारांना निवेदन देवून करण्यात आली.

निवेदनातील माहिती अशी : सोलापूर येथे ओबीसी मेळाव्यात (Solapur OBC Meeting) बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांना उद्देशून आणि संसद सदस्याच्या जीवित्तास धोका निर्माण करण्यासाठी प्रक्षोभक व भडकाऊ वक्तव्य करून उपस्थित समुदायाला हिंसा करण्यास चिथावणी दिली.

हेही वाचा: चर्चा तर होणारच! जिल्हा बँकेचं राजकारण तापलं; BJP-NCP आमदार एकत्र?

Karad Taluka Maratha Kranti Morcha

Karad Taluka Maratha Kranti Morcha

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांची जनतेतील प्रतिमा मलिन करून बदनामी केली जात आहे. यापूर्वी अनेकवेळा मराठा समाजात संताप निर्माण होईल, अशी मराठाविरोधी वक्तव्य संबंधित मंत्री यांनी केली आहेत. अशा या मराठाव्देषी मंत्र्यांना मराठा आरक्षण उपसमितीमधून तात्काळ हटवण्यात यावे. समाजा-समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत असल्याबद्दल मंत्रीमंडळातून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा सामाजिक सलोखा बिघडल्यास, तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास राज्य सरकार जबाबदार असेल, असाही इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

loading image
go to top