

Maratha Kranti Morcha
esakal
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण उपसमितीला ओबीसी आरक्षण उपसमितीच्या धर्तीवर निर्णय घेण्याचे अधिकार द्या, अन्यथा ही समिती बरखास्त करा.. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. निर्णय घेण्याचे अधिकारच नसतील तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशीदेखील मागणी मराठा क्रांती मोर्चाने केलीय. शिर्डी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील समन्वयकांची बैठक पार पडली.