Shashikant Pawar : मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांचं निधन

Shashikant Pawar : मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांचं निधन

मुंबईः मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांचं काही वेळापूर्वी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने मराठा चळवळीची हानी झाल्याच्या भावना अनेकजण व्यक्त करीत आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात ट्विट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व हरपल्याने दुःख झाल्याच्या भावना पवारांनी व्यक्त केल्या.

मराठा समाजाच्या हितासाठी तळमळीने काम करणारा नेता- पवार

मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांच्या निधनानं मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होतं. मराठा समाजाच्या हितासाठी तळमळीनं काम करणारा नेता हरपला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!

अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच राज्यभरातून मान्यवर मंडळी शशिकांत पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत आहेत.

मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते अशी त्यांची ओळख असली तरी बहुजनांची नेहमी बाजू घेणारे अशीही त्यांची ख्याती होती. रत्नागिरी मराठा बिझनेसमेन फोरमच्या बैठकीसाठी ते परवा मुंबईहून तेथे गेले होते. आज संध्याकाळी तेथून परत येताना वाटेतच त्यांना पाली परीसरात हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेच खोपोली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११ वाजता दादर येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. त्यांच्यामागे पत्नी तसेच वीरेंद्र व योगेश हे मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com