Ajit Pawar : ''मनोज पाटलांनी घेतलेल्या भूमिकेबाबत आम्ही सकारात्मक, पण...'' अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar : ''मनोज पाटलांनी घेतलेल्या भूमिकेबाबत आम्ही सकारात्मक, पण...'' अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

माढाः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माढ्यामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कार्यक्रमापूर्वी अजित पवारांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी अजित पवारांनी मराठा आरक्षणाबद्दल पक्षाची आणि सरकारची भूमिका मांडली.

अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं, परंतु ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही. सध्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात आरक्षणाचा लढा तीव्र केला आहे. ते म्हणतात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. मात्र सध्या ओबीसी समाजामध्ये साडेतीनशे जाती आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आम्हाला सगळ्यांना आरक्षण मिळत नाही. जे खरोखरच कुणबी आहेत, त्यांना आरक्षण आहे. त्यामुळे या प्रश्नावर विचार सुरु आहे.

Ajit Pawar : ''मनोज पाटलांनी घेतलेल्या भूमिकेबाबत आम्ही सकारात्मक, पण...'' अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
''कुणबी प्रमाणपत्र देऊन तात्पुरती मलमपट्टी नको, मराठा म्हणून आरक्षण द्या'', मराठा क्रांती मोर्चाची वेगळी भूमिका

अजित पवार पुढे म्हणाले की, पुढारलेल्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. परंतु एक घटक असा आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे. स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा आपण ३५ कोटी होतो. आता १४० कोटी झालो. त्यात कोणी थांबायलाच तयार नाही, त्यामुळे प्रश्न उपस्थित होत असून दोन आपत्यांपर्यंत थांबलं पाहिजे.

''लोकसंख्या वाढल्याने जमिनीच्या वाटण्या झाल्या आणि मराठा समाजातील शेतकरी अल्पभूधारक ठरले. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मनोज पाटलांनी केलेल्या मागणीसंदर्भात आम्ही अनेक तज्ज्ञांशी बोलत आहोत. त्याबाबत सरकार निर्णय घेणार आहे.''

Ajit Pawar : ''मनोज पाटलांनी घेतलेल्या भूमिकेबाबत आम्ही सकारात्मक, पण...'' अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Dasara Melawa 2023: परंपरा मोडली ! मुंबईच्या डबेवाल्यांची ठाकरेंच्या दसरा मेळाव्याकडे पाठ, सांगितलं कारण..

अजित पवार पुढे म्हणाले मनोज जरांगे यांच्या सभेला मोठी गर्दी होतेय, परंतु ज्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, तेही लोक सभेला जात आहेत. ईडब्ल्यूएस प्रवर्गातून १० टक्के आरक्षण मिळाल्यापासून मराठा समाजाला किती फायदा झाला, तेही आम्ही बघितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com