Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या ठाण्यातल्या सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, कुणबी नोंदी...

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या ठाण्यातल्या सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, कुणबी नोंदी...
Updated on

कोल्हापूरः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. धनगर आरक्षणावरुन जालन्यात तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत, त्यावरुनही शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील शेतकरी, बेरोजगार.. सर्वांचे प्रश्न सुटू दे आणि सर्वांना सुख-समृद्धी मिळू दे, असं साकडं अंबाबाईला घातलं आहे. जालना प्रकरणातील माहिती मी घेतली नसून आधी माहिती घेतो आणि मग त्यावर बोलतो, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या ठाण्यातल्या सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, कुणबी नोंदी...
Tata Group: टाटा कंपनीच्या शेअरने रचला इतिहास, गुंतवणूकदार झाले मालामाल, काय आहे कंपनीचा प्लॅन?

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची ठाण्यामध्ये सभा होत आहेत. त्यावरुन मुख्यमंत्री म्हणाले की, जरांगे पाटील हे मराठा बांधवांना ते भेटत आहेत. ती माझ्या विरोधातली सभा नाहीये. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत आणि संवाद साधत आहेत.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या ठाण्यातल्या सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, कुणबी नोंदी...
Share Market Closing: शेअर बाजारात 2 दिवसांनी खरेदी; सेन्सेक्स 275 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार त्याबाबतीत कटिबद्ध आहे. कुणावरही अन्याय न करता सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ते कायमस्वरुपी टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com