Maratha Reservation Sakal
महाराष्ट्र बातम्या
Maratha Reservation : हैदराबाद-सातारा गॅझेट लागू करण्याची शक्यता, ओबीसी आरक्षणाला धक्का नाही : विखे पाटील
Vikhe Patil Statement : हैदराबाद व सातारा गॅझेट लागू केल्यास ओबीसी आरक्षणाला कुठलाही धोका नाही, असा विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला असून, सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई : हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू केल्याने ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नसल्याचे वक्तव्य जलसंपदा मंत्री आणि मराठा अरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले. सर्वोच्च न्यायालयाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत दिलेले निर्देश कायदेशीररीत्या तपासून पाहिले जात असून, सरकार सकारात्मक असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. यामुळे राज्य सरकार आणि मराठा आंदोलकांमधील कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

