
Maratha Reservation: मराठा आंदोलकांनी बुधवारी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. शुक्रवारी आंदोलक मुंबईतल्या आझाद मैदानात दाखल होतील. शनिवारी सकाळपासून मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषण सुरु करणार आहेत. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यासाठी हे आंदोलन पार पडणार आहे.