
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका सोमवारी मुंबईकरांना बसला. ‘सीएसएमटी’ आणि वाशी स्थानकात आंदोलक अचानक रुळावर उतरले. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणाबाजीसह आंदोलकांनी लोकल वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उपनगरी रेल्वे सेवेला (लोकल) २० ते २५ मिनिटांचा विलंब सहन करावा लागला.