
बापू सुळे
मुंबई : आरक्षणासाठी मुंबईत आलेला गरजवंत मराठा समाजाची सरकारने पहिल्याच दिवशी येथील हॉटेल, खाद्य पदार्थांचे स्टॉल बंद ठेवून आमची उपासमार केली. पण सरकारने आम्ही येथे हौस म्हणून जेवायला आलो नाही, तर आरक्षणासाठी आलोय, आम्हाला तुम्ही एक दिवस उपाशी ठेवले, पण आज आम्ही पंचतारांकित ताज हॉटेल समोरच येथील गोरगरिबांसह आंदोलकांसाठी जेवणावळी घालतोय. कोण जेवण घेतोय हे आम्ही पाहत नाही, तर त्याला लागलेली भूक जाणत आहोत. त्यामुळे कितीही लोकं आली तरी जेवण कमी पडू देणार नाही असा दांडगा उत्साह आज ताज हॉटेलच्या रस्त्यावर दिसला.