मराठा समाज कोणाच्या दावणीला बांधणार नाही. समाज स्वतःचा मालक आहे. मी समाजावर मनमानी केली नाही आणि करणारही नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
पंढरपूर : राज्यातील निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठा राजकीय दावा केला. "मी आणि मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असतो आणि समीकरण जुळले असते तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता, असा अप्रत्यक्ष टोला मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे.