esakal | मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन : संभाजीराजे
sakal

बोलून बातमी शोधा

MP chhatrapati sambhajiraje gets angry about maratha reservation after student suicide in Osmanabad

मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन : संभाजीराजे

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्हापूर: खासदार संभाजीराजे छत्रपती खासदार संभाजीराजे आंदोलन स्थळी दाखल. कोल्हापुरातून राजश्री शाहू महाराजांच्या(Shahu Maharaj Samadhi place) समाधी पासून मूक आंदोलनाला-(silent-agitation )सकाळी10 पासून सुरुवात होणार आहे.राज्यभरातील समन्वयक आंदोलनाला हजार झाले आहेत. मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन आहे. हा मूक मोर्चा आहे. आज लोकप्रतिनिधी बोलतील, मराठा समाज दु:खी आहे. समाजाला न्याय मिळावा अशी सरकारला विनंती आहे. आमचा लोकप्रतिनिधींवर विश्वास आहे, मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.(maratha-reservation-silent-agitation-live-in-kolhapur)

खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत. मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दरम्यान धैर्यशील माने नुकतेच कोरोना निगेटिव्ह झाले आहेत.

चंद्रकांत पाटील मराठा समाजाच्या मूक मोर्चात सहभागी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मराठा समाजाच्या मूक मोर्चात सहभागी झाले आहेत. "मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना पाठिंबा देणार, आज कोल्हापूरचा नागरिक आंदोलनात सहभागी झालो आहे," अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

प्रकाश आंबेडकर कोल्हापुरातील मूक मोर्चात सहभागी

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोल्हापुरातील आंदोलन स्थळी दाखल झाले आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या मूक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ते कोल्हापुरात पोहोचले आहेत.

मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलनाला राज्यभरातून समन्वयक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनाला येणाऱ्या प्रत्येक समन्वयकाची नोंद कोल्हापूर पोलिसांनी ठेवली आहे. कोरोना संकटाचे सर्व नियम पाळून आंदोलन व्हावं, असं आवाहन देखील कोल्हापूर पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे.

loading image