
मुंबई : ‘‘मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात टिपणी करणारे तसेच मराठा आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भेट घेऊ द्या,’’ अशी मागणी करत काही मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाबाहेर गर्दी केली होती; उच्च न्यायालयात सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना अडविल्याने पुढे होणारा अनर्थ टळला.