पटेल आंदोलनाप्रमाणे मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न: मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

गुजरातमध्ये पटेलांचे आंदोलन ज्या प्रकारे हाणून पाडले, त्याच धर्तीवर मराठा आंदोलन देखील चेपण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न सुरू आहे. शेतकरी अांदोलनात सरकारने ज्या प्रकारे फुट पाडली, त्याच धर्तीवर मराठा अांदोलनातही फुट पाडण्याची खेळी सरकार करत आहे. मराठा क्रांती मोर्चातील काही समन्वयकांची बैठक घेवून संपुर्ण समाजाला हुसकवण्याचा प्रकार होत असल्याची टीका मुंडे यांनी केली. 

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने महाराष्ट्र अस्थिर झालेला असाताना मुख्यमंत्री मात्र यामध्ये राजकिय हेतूनेच फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

#MarathaKrantiMorcha

राष्ट्रवादीचे नेते व आमदारांची आज मुंडे यांच्या सरकारी निवासस्थानी बैठक झाली .यावेळी राज्यातील चिंताजनक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. 

गुजरातमध्ये पटेलांचे आंदोलन ज्या प्रकारे हाणून पाडले, त्याच धर्तीवर मराठा आंदोलन देखील दडपण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न सुरू आहे. शेतकरी अांदोलनात सरकारने ज्या प्रकारे फुट पाडली, त्याच धर्तीवर मराठा अांदोलनातही फुट पाडण्याची खेळी सरकार करत आहे. मराठा क्रांती मोर्चातील काही समन्वयकांची बैठक घेवून संपुर्ण समाजाला हुसकवण्याचा प्रकार होत असल्याची टीका मुंडे यांनी केली. 

दरम्यान राज्य मागास आयोगाची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा अहवाल तातडीने सादर करण्याची विनंती राष्ट्रवादीचे शिष्टममंडळ करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha Dhananjay Munde criticize Devendra Fadnavis on Maratha Reservation