थेट बाँडपेपरवर दिला जाहीरनामा; आपच्या उमेदवाराची अनोखी शक्कल 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार अनोख्या शकला लढवतायत. त्यातच जालन्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने आयडियाची कल्पना केलीये. कायमच  उमेदवार हे जनतेला आश्वासनं देतात आणि निवडले गेलेत की सर्व आश्वासनं पद्धतशीर विसरतात. हाच जनतेतील अविश्वास दूर करण्यासाठी आम आदमी पक्षाचे उमेदवार संतोष मगर यांनी चक्क 100 रुपयांच्या बाँडपेपरवर त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. 

"मी संतोषकुमार आनंदा मगर परतूर मंठामधून आम आदमी पार्टीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. माझा निवडणूक जाहीरनामा मी बाँडपेपरवर  नोटरी करून जनतेला देत आहे, यातील आश्वासनं पूर्ण न केल्यास मी जनतेला माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार देत आहे." असं संतोषकुमार यांनी  बाँडपेपरवर लिहून दिलंय. 

संतोषकुमार यांनी अनोख्या स्वरूपात सादर केलेला हा जाहीरनामा यामुळे सगळीकडे आता या स्मार्ट उमेदवाराची चर्चा होतेय. या बाँडपेपरवर जवळजवळ 11 वेगवेगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत. दरम्यान या गोष्टींची पूर्तता झाली नाही तर माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार या उमेदवाराने मतदारांना दिलाय.   

मतदार राजाचा उमेद्वारांबद्द्लचा समज बदलण्यासाठी अश्या प्रकारचा जाहीरनामा सादर करण्यास काहीच हरकत नाही असं मत संतोषकुमार यांनी मांडला आहे. दरम्यान मी शंभर टक्के निवडून येईन असं विश्वास संतोषकुमार यांनी व्यक्त केलाय. 

WebTitle : marathi news aap candidate share his election manifesto on bondpaper 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aap candidate share his election manifesto on bondpaper