प्रचारात नेत्यांना 'बाऊन्सर'चं कवच

माधव सावरगावे, औरंगाबाद
Tuesday, 15 October 2019

  • प्रचारात नेत्यांना 'बाऊन्सर'चं कवच
  • सभा,मिरवणुकांमध्ये नेत्यांच्या सुरक्षेचं काम
  • पीळदार शरीरयष्टीच्या 'बाऊन्सर'ना मोठी मागणी

सुदृढ,पीळदार शरीरयष्टीसाठी जीममध्ये मेहनत घेणारे तरुण सध्या खूप बिझी आहेत. व्यायाम करण्यासाठीही त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. याचं कारण त्यांच्यावर सध्या दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेची असणारी जबाबदारी. सभा, मिरवणुकीदरम्यान नेत्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना मोठी मागणी आहे.

उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असो. प्रचारादरम्यान प्रत्येक उमेदवाराकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जातंय. अशावेळी कोणताही धोका नको, म्हणून नेते या बाऊन्सरना पाचारण करण्यात येतंय. 

पीळदार शरीर तयार कऱण्यासाठी चार-पाच वर्षांची मेहनत असते. एका 'बाऊन्सरला दररोज एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंतचा पगार मिळतो. वर्षांतून ५० ते ६० दिवस काम मिळतं. दरम्यान, औरंगाबादमधील २०० तरुण बाऊन्सर म्हणून काम करत आहेत.  

निवडणूक लोकशाहीचा उत्सव मानला जातो. हा उत्सव सुरु असेपर्यंत तरी या तरुणांच्या हाताला काम असणार आहे.

WebTitle : marathi news bouncers are in demands during vidhansabha election scenario

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bouncers are in demands during vidhansabha election scenario