केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या गाडीला अपघात

gite
gite

रायगड : शिवसेना नेते आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचा आज अपघात झाला. त्यांच्या वाहनाच्या ताफ्यातील गाड्या एका दुचाकीस्वारामुळे एकमेकांवर आदळल्या आणि गीते यांच्या गाडीला पुढून आणि मागून धक्का बसला. हा अपघात पालीजवळ झाला. या अपघातात गीते यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून, ते सुखरुप आहेत.

त्यांच्या अपघाताची बातमी वाऱयासारखी पसरली आणि त्यांना दुखापत झाली असेही काही प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात आले. मात्र, गीते सुखरूप असून ते पुढील प्रवासाला निघाले आहेत, अशी माहिती रायगडचे एसपी अनिल पारस्कर यांनी दिली. या अपघातानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनंत गीते यांची दूरध्वनीवरून चौकशी केली. 

गीते यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलट गाडीसमोर दुचाकीस्वार आडवा आला. त्यामुळे पोलिसांच्या गाडीचा अचानक ब्रेक दाबण्यात आला. त्यामुळे मागे असलेली गीते यांच्या गाडीने समोरील पायलट व्हॅनला धडक दिली. तर गीते यांच्या मागे असलेल्या दुसऱ्या एका पायलट व्हॅनने गीते यांच्या गाडीला धडक दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com