जलयुक्त शिवारासाठी 1500 कोटींची तरतूद : मुनगंटीवार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

''सूक्ष्म सिंचनासाठी 432 कोटींची तर विहिरींसाठी 132 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील जलयुक्त शिवार या योजनेसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे''.

-  सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

मुंबई : सूक्ष्म सिंचनासाठी 432 कोटींची तर विहिरींसाठी 132 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील जलयुक्त शिवार या योजनेसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत दिली.

2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री मुनगंटीवार सादर करत आहेत. मुनगंटीवार यांच्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प आहे. यावेळी मुनगंटीवार यांनी विविध योजनांसाठी आर्थिक तरतूदींची घोषणा केली. ते म्हणाले, ''शिवस्मारकाची निविदा अंतिम टप्प्यात असून, या शिवस्मारकासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय आंबा आणि काजू उत्पादन वाढवण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जलसंपदा विभागासाठी 8233 कोटींची तरतूद करण्यात आली असून, जलयुक्तशिवारासाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे''.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Maharashtra News Budget News Sudhir Mungantiwar