"एमजीएनएल'तर्फे नाशिककरांना तीन महिन्यात गॅस पुरवठा: राजेश पांडे 

residentional photo
residentional photo

नाशिक- झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत नाशिकने स्थान मिळवले असून औद्योकि क्षेत्रात कंपन्या,÷उद्योजक,गुंतवणूकदारांनी आपले प्रकल्प साकारत या शहरातच पाय रोवायला सुरवात केली आहे. अशावेळी नाशिककरांना ÷बदलत्या परिस्थितीनुसार अद्यावत सोयीसुविधा पुरवणे, हे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड(एमजीएनएल)चे कर्तव्य आहे. याच भावनेतून सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याचे आम्ही ठरविले. टर्मिनलच्या कामानंतर येत्या तीन महिन्यात आम्ही नाशिककरांना गॅस पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी कटीबध्द आहोत,असे महाराष्ट्र गॅस नॅचरल लिमिटेड(एमजीएनएल)चे संचालक राजेश पांडे यांनी "सकाळ'ला सांगितले. तुलनेने स्वस्त व प्रदुषणविरहित गॅसअसल्याने ग्राहकांची नक्कीच पसंती मिळेल,असेही ते म्हणाले. 
श्री.पांडे काल कौटुंबिक कार्यक्रमासाठी नाशिकला आले होते. त्यावेळी "सकाळ'ला मुलाखत देत त्यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला. ते म्हणाले, पेट्रोल,डिझेलसह जीवनावश्‍यक वस्तूंच्या महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले आहे. आम्ही उपलब्ध करून देत असलेला "सीएनजी' गॅस किंमतीच्या दृष्टीने सामान्यांना परवडणारा आहे. विशेषतः घरगुतीबरोबरच सार्वजनिक वाहतूकीसाठी याचा जास्त उपयोग होईल. सीएनजी वापरावरील रिक्षा व अन्य वाहनांचे भाडे हे अल्प आहे. रिक्षाद्वारे सीएनजीचा तर चांगला प्रचार होतो आहे. नाशिक हे सर्वचबाबतीत बदलत असल्याने सीएनजीच्या वाहतूकीस नाशिककर प्राधान्य देतील. शिवाय शहर परिसरातील वाढते प्रदुषण रोखण्यासही मदत होईल. 


"गॅस बेस इकॉनॉमी' एक चॅलेज 
ते म्हणाले, देशाची बदलती अर्थव्यवस्था आणि इंधनाचे इतर देशावर अवलंबून असलेले परावलंबित्व, यामुळे नागरीकांच्या खिशालाच फटका बसतो. यातूनच आता सीएनजी,पीएनजीसारख्या पर्यायी इंधनाचा वापर देशात वाढविण्याच्यादृष्टीने विचार होऊ लागला असून भविष्याची ती गरज बनली आहे. या वापराबाबत आंतरराष्ट्रीयस्तरावरही दबाव वाढत आहे. गॅस बेस इकॉनॉमी अर्थात "जीबीई' समतोल राखणे हे एक चॅलेंज आहे आणि त्यादृष्टीने सीएनजी,पीएनजीसारख्या गॅसचा वाढता वापर ही एक क्रांतीच म्हणता येईल. "एमएनजीएल'ने अधिक विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. सध्या आमचे 70 ते 80 स्टेशन्स सुरु आहे. 
उत्तर महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रीत,सिलेंडर फ्री क्षेत्र 
नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील आघाडीचे शहर आहे,या शहराचा औद्योगिकविस्तार लक्षात घेऊन आम्ही नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला प्राधान्य दिले असे सांगुन ते म्हणाले,आज आपल्याकडे सिलेंडर गॅस येतो,आपण तो स्विकारतो,पण आता पाईपलाईन झाल्यानंतर नाशिक परिसर हा "सिलेंडर फ्री' होईल. तुलनेने स्वस्त आणि प्रदुषणविरहित असल्याने अधिकाधिक वाहनांचा वापरही सीएनजीवर होईल यात शंका नाही. त्यादृष्टीने एमएनजीएलचे नियोजन सुरु आहे. 
 
सर्व्हे पूर्ण,परवान्यांसाठी प्रयत्न,मनपाचे सहकार्य 

महापालिकेतील सर्वांचेच आम्हाला सर्वोतोपरी सहकार्य लाभत आहे. त्यामुळे कामास गती मिळाली आहे असे सांगुन श्री.पांडे म्हणाले,शहर परिसरातील 
सर्व्हेचे काम आमचे पूर्ण झाले आहे आता प्रत्यक्ष पाईपलाईनसह इतर कामांकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. किरकोळ परवान्यांचा विषय मार्गी लागणे बाकी आहे. महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास पुढील काही दिवसात टर्मिनल उभारणी पूर्ण करून सीएनजी स्टेशन कार्यन्वित होईल आणि त्याच ठिकाणाहुन घरगुती गॅसही उपलब्ध असेल. 

पुणे महापालिकेच्या धर्तीवरच नियोजनास प्राधान्य 
पाईपलाईन खोदाईसाठीच्या दराबद्दल बोलतांना ते म्हणाले,महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या पाईपलाईन खोदाईच्या दराबाबत आम्ही पुणे महापलिकेने धर्तीवर नाशिकला प्राधान्य दिले. पुणे मनपा अनेक वर्षापासून एमजीएनएलबरोबर काम करते आहे. नाशिकलाही त्याचप्रकारे दर निश्‍चित केले. पण कमी जास्त दर देण्याचा प्रश्‍नच नाही. शेवटी बीपीसीएल,गेलच्या सहयोगातून निर्मित या कंपनीत "एमजीएनएल' अर्थात महाराष्ट्र शासनाची कंपनी असून त्यात शासनाचा सहभाग आहे हे लक्षात घ्यायला हवे. हा गॅस हवेत विरघळतो त्यामुळे एलपीजी गॅसपेक्षा यात जोखीम,अपघाताचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नांचे उत्तर देतांना सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com