विद्यार्थ्यांचे आधार अद्यावत करण्यात विद्येचे माहेरघर शेवटच्या रांगेत; सिंधुदुर्गची बाजी

विद्यार्थ्यांचे आधार अद्यावत करण्यात विद्येचे माहेरघर शेवटच्या रांगेत; सिंधुदुर्गची बाजी
saral portal aadhar updation
saral portal aadhar updationsaral portal aadhar updation

तळोदा (नंदुरबार) : सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे (saral school portal) आधार क्रमांक (Aadhar updation) अद्यावत करण्याच्या प्रक्रियेत आजअखेर पर्यंतच्या आकडेवारीमध्ये राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांक असून नंदुरबार जिल्ह्यानेही (Nandurbar district) चांगली कामगिरी करीत आठवा क्रमांक मिळवला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखला जाणारा व शैक्षणिक बाबतीत नेहमीच पुढे असणारा पुणे जिल्हा (Pune district) या क्रमवारीत चक्क शेवटून तिसरा क्रमांकावर आहे तर ठाणे जिल्हा शेवटून दुसरा व औरंगाबाद जिल्हा शेवटच्या स्थानी आहे. (saral school portal student aadhar updation sindhdurg first rank)

राज्यातील सर्व माध्यमिक व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय शासनाने जून २०१३ मध्ये घेतला होता. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अविरतपणे 'सरल' प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्यावत करण्याचे काम सुरु आहे. ११ मे २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण २ कोटी १५ लाख ७६ हजार ५१६ इतक्या विद्यार्थ्यांपैकी १ कोटी ६४ लाख ७५ हजार ८९८ इतक्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांकाची माहिती सरल प्रणालीमध्ये अद्यावत करण्यात आली आहे. अजूनही ५१ लाख ६१८ इतक्या विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणे बाकी आहे. राज्यातील एकूण ७६.३८ टक्के विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करण्यात आली असून २३.६२ टक्के विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणे बाकी आहे.

saral portal aadhar updation
मित्राला घरी सोडायला लावले; पण घरी पोहचण्याआधीच काळाचा घाला

लॉकडाउनचाही परिणाम

दरम्यान कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. परिस्थिती देखील चिंताजनक राहिली आहे. त्यामुळे मुलांचे आधार कार्ड काढणे शक्य झाले नसल्याचे व एकूणच त्यांचा परिणाम आधार क्रमांक 'सरल'मध्ये अद्यावत करण्याच्या प्रक्रियेवर झाला असल्याचे बोलले जात आहे.

नंदुरबार जिल्हा आठव्या क्रमांकावर

राज्याच्या शिक्षण संचालयाचा आकडेवारी नुसार आजअखेर पर्यंत 'सरल' प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्यावत करण्याच्या प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम, वर्धा जिल्हा द्वितीय तर भंडारा जिल्हा तृतीय क्रमांकावर आहेत. नंदुरबार जिल्ह्यानेही विपरीत परिस्थिती असताना देखील चांगली कामगिरी करताना या क्रमवारीत आठवा क्रमांक प्राप्त केला आहे. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५१ हजार ९३१ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख १७ हजार ६५३ इतक्या विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करण्यात आली असून ३४ हजार २७८ इतक्या विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणे बाकी आहे.

saral portal aadhar updation
आशादायक..नंदुरबार जिल्ह्यात ३१६ गावे कोरोनामुक्त

खुलासा घेण्यात यावा

विभागीय उपसंचालक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन ज्या जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा कमी कामकाज झाले आहे, त्या जिल्ह्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांकडून याबाबत खुलासा घेण्यात यावा अश्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. राज्याच्या सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेले गडचिरोली, अमरावती, लातूर, परभणी, रायगड, अकोला, पालघर, नाशिक, वाशिम, पुणे, ठाणे, औरंगाबाद आदि जिल्हे आहेत.

जिल्हानिहाय माहिती अद्यावत केल्याची टक्केवारी

सिंधुदुर्ग- ९७.१९, वर्धा- ९५.९२, भंडारा- ९५.९१, जळगाव- ९३.२१, गोंदिया- ९२.२९, चंद्रपूर- ९१.६८, बुलढाणा- ९०.५३, नंदुरबार- ९०.२६, सातारा- ८९.०४, नाशिक- ८८.५८, अहमदनगर- ८७.७९, नांदेड- ८६.७९, रत्नागिरी- ८६.५०, सोलापूर- ८६.४५, यवतमाळ- ८५.३३, बीड- ८४.३८, धुळे- ८२.५९, उस्मानाबाद- ८२.५५, जालना- ८२.२१, हिंगोली- ८१.५२, कोल्हापूर- ७९.७२, सांगली- ७७.३५, मुंबई- ७६.९९, गडचिरोली- ७३.८४, अमरावती- ७१.३८, लातूर- ७१.३०, परभणी- ७०.२७, रायगड- ६९.६७, अकोला- ६९.२८, पालघर- ६८.०२, नाशिक- ६७.१६, वाशिम- ६४.४६, पुणे- ६३.०७, ठाणे- ५३.१८, औरंगाबाद- ५०.४३.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com