MPSC
MPSC

यशाची गुरुकिल्ली तुमच्याच हातात!

मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आयुष्यातील एका-एका गुणाचे महत्त्व दाखवून देणारी असते. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासाइतकेच वेळेचे व्यवस्थापन, वाचन, स्वयंअध्ययन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. त्यासाठीच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठीची गुरुकिल्ली जाणून घेणे आवश्‍यक आहे. 

वेळेचे व्यवस्थापन 
वेळेचे व्यवस्थापन ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. त्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. 

  • राज्यसेवा पूर्वपरीक्षा एप्रिल व पीएसआय, एसटीआय, एएसओ या पदांची पूर्वपरीक्षा 6 मे रोजी होणार असल्यास, आतापासून आपल्याकडे किती दिवस उपलब्ध आहेत, याची गोळाबेरीज करा. 
  • दोन्ही परीक्षांसाठी समान असणारा अभ्यासक्रम कोणता आहे व त्या अभ्यासक्रमाचे नियोजन कसे जुळवता येईल, याचा विचार करा. 
  • उरलेले दिवस अभ्यास पूर्ण करण्यासाठी विभाजित करा. 
  • दोन्ही परीक्षांचे सराव पेपर सोडविण्यासाठीचा वेळ द्या. 
  • उजळणीसाठी आवश्‍यक कालावधी निवडा. 
  • गटचर्चेसाठी द्यावा लागणारा कालावधी वेगळा काढा. 
  • सराव चाचण्यांचा सराव करताना ज्या घटकांमध्ये आपण कमी पडतो, अशा घटकांची तयारी करा. 

अशा पद्धतीने वरील प्रमुख मुद्दे घेऊन वेळेचे व्यवस्थापन केल्यास निश्‍चितच चांगले गुण मिळविता येतील. फक्त त्याचा बाऊ न करता अगदी सुटसुटीतपणे प्रत्येक घटकानुसार त्याला विशिष्ट वेळ देऊन नियोजन करावे लागेल. 

Sakal Shiveri Foundation MPSC UPSC Exam Test Series

वेळेचे व्यवस्थापन कसे कराल? 

  • परीक्षेमध्ये कोणकोणते विषय आहेत हे समजावून घ्या. 
  • प्रत्येक विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे समजावून घ्या. 
  • या घटकांचे अभ्यासाच्या सोयीनुसार छोटे-छोटे टप्पे करा. 
  • हे टप्पे पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी तयार करताना शेवटचे कमीत कमी 21 दिवस उजळणीसाठी व सराव चाचण्यांसाठी असावेत. 
  • वेळेचे व्यवस्थापन करताना स्वतःची परीक्षा स्वतःच घेऊन पाहा.

स्वपरीक्षा कशी असावी... 
स्वतःच स्वतःची परीक्षा घेणे हादेखील अभ्यासातील एक महत्त्वाचा पर्याय आहे. त्याचे कारण आपण मनाची समजूत घालू शकतो. मात्र, स्वतःला फसवू शकत नाही. त्यातही जेव्हा आयुष्याच्या एका महत्त्वाच्या क्षणासाठी आपण आपले सारे कौशल्य पणाला लावू इच्छित असतो, तेव्हा तर नक्कीच आपण सजग असले पाहिजे. म्हणूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास एका विशिष्ट वळणावर पूर्ण होत आला असताना आपण स्वतःचीच परीक्षा घेण्याचा उत्तम पर्याय विचारात घेऊ शकतो. ही परीक्षा कशी घ्यावी, का घ्यावी याविषयी थोडेसे.. 

  • परीक्षेतील प्रश्‍न सोडविण्यासाठी कमी कालावधी उपलब्ध असतो. अगदी एका प्रश्‍नाला काही सेकंद अशी स्थिती असते. 
  • अशा कमी कालावधीमध्ये प्रश्‍न झटपट आणि अचूक सोडविण्याची तयारी करण्यासाठी याचा सराव आवश्‍यक असतो. 
  • अगदी उदाहरण घ्यायचे झाल्यास बौद्धिक चाचणीच्या प्रश्‍नांचा सराव करताना 40 प्रश्‍न समोर घेऊन 20 ते 25 मिनिटांमध्ये ते सोडविण्याचा प्रयत्न करावा. या कालावधीमध्ये नेमक्‍या येणाऱ्या अडचणी आपणास समजण्यास मदत होते. 
  • असा स्वतःच स्वतःची परीक्षा घेणारा सराव प्रत्येक विषयाच्या बाबतीत झाल्यास गुणवत्ता कशीही असो, तुम्ही त्या यादीत असता हे नक्की!

वाचन 

  • बऱ्याचदा परीक्षेसाठी काय वाचावे, काय नाही, हे समजत नाही. त्यातून वैचारिक गोंधळ वाढतो. 
  • असा गोंधळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. 
  • कित्येक विद्यार्थी आपल्या दैनंदिन गरजांमध्ये (गृहिणी, कामगार वर्ग, ग्रामीण अथवा शहरी भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी) इतके अडकून पडलेले असतात, की त्यांना इतर साहित्य वाचनास वेळच मिळत नाही. 
  • वाचनास वेळ मिळाला, तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून नेमके काय वाचावे याच्या माहितीचा अभाव असतो. 

यावर उपाय एकच.... 
संपूर्ण अभ्यासक्रमाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची मदत घ्यावी लागेल. आणि यासाठीच "शिवनेरी फाउंडेशन'ने "एमपीएससी'चे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे, डॉ. चंद्रकांत कणसे, कुंडलिक कारकर, निवृत्त सनदी अधिकारी भिवाजी पऱ्हाड व सध्या शासनसेवेत असणारे विशाल साकोरे आदींच्या मार्गदर्शनाखाली "एमपीएससी'मार्फत घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या अभ्यासाची सुरवात अगदी योग्य पद्धतीने व आत्मविश्‍वासपूर्ण पद्धतीने करता येईल. 

व्याख्याने 
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तज्ज्ञांची व्याख्याने हा एक महत्त्वाचा भाग आपली बौद्धिक पातळी वाढविण्यास उपयोगी ठरतो. "शिवनेरी फाउंडेशन'च्या तंत्रात नेमके हेच हेरून संपूर्ण व्हिडिओ फितीची व्याख्याने तयार केली आहेत. या 
व्हिडिओ लेक्‍चर्समुळे एखाद्या अवघड किंवा गहन विषयाचे सहज सोप्या पद्धतीने आकलन होऊ शकते. यामध्ये विषय सोपा करून सांगण्याची पद्धत असून, अभ्यासक्रमामधील अवघड संकल्पना अगदी सहजसुलभ पद्धतीने समजावून घेण्यास मदत होणार आहे. 

"शिवनेरी'चेच डिजिटल तंत्र का? 

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम अगदी प्रत्येक घटकांनुसार उपलब्ध. 
  • प्रत्येक परीक्षेच्या स्वरूपानुसार राज्यभरातून केवळ 5 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करून अशा विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेण्याचा पहिल्या टप्प्यात प्रयत्न. 
  • प्रत्येक परीक्षेच्या प्रकारानुसार आवश्‍यकतेप्रमाणे संगणकासाठी वेगवेगळे पेन ड्राइव्ह, तसेच विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा लाभ मोबाईलद्वारे मेमरी कार्डच्या रूपाने करून घेता येईल. 
  • या तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्याला संपूर्ण अभ्यासक्रम एकत्रितपणे उपलब्ध होणार. 
  • विद्यार्थ्याला कमी वेळेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करता येईल. 
  • आवश्‍यक असलेल्या चालू घडामोडी नोंदणीकृत विद्यार्थ्यास त्याच्या व्हॉट्‌सऍप अथवा ई-मेलवर स्वतंत्रपणे अखंड उपलब्ध होणार. 
  • शंका असल्यास विद्यार्थ्याने संबंधित प्रश्‍न "शिवनेरी ऍकॅडमी'च्या ई-मेलवर पाठविल्यास 24 तासांच्या आत त्या प्रश्‍नाचे उत्तर संबंधित विद्यार्थ्याला व्हॉट्‌सऍप किंवा ई-मेलवर पाठविले जाणार. यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या सोयीच्या ठिकाणीच परिपूर्ण अभ्यास करता येईल. 
  • महत्त्वाचे म्हणजे, एखादा विद्यार्थी एरवी 100 गुण मिळवत असेल, तर तो या तंत्रज्ञानाची मदत घेऊन 180 ते 200 गुणांपर्यंत पोचू शकेल. 

"स्मार्ट वर्क'मधून साधले यश 
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पहिल्या प्रयत्नात जिल्हाधिकारी होणारे बोटावर मोजण्याइतपत असतात. बरीच वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळाले नाही, तर नैराश्‍य येते. मात्र, अभ्यासासोबतच एखादा छंदही जोपासल्यास नैराश्‍य दूर होण्यास मदत होते. नियमित अभ्यास आणि प्रामाणिकपणे परिश्रम घेतल्यास नक्कीच यशोशिखर चढता येते, असा सल्ला अचलपूर येथील उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत अक्षय मंडवे यांनी "सकाळ'शी बोलताना दिला. 
अक्षय मंडवे हे मूळ अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी आहेत. "हार्डवर्क' करण्यापेक्षा "स्मार्ट वर्क'वर भर देऊन कमी वेळात जास्त अभ्यास कसा करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पुणे विद्यापीठाचे वातावरण आणि सीनिअर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कामी आल्याचेही ते म्हणाले. शिवाय बारावीपर्यंतची शालेय पुस्तके, यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत आणि परिस्थितीवर मात करून यश संपादन केलेले विद्यार्थी प्रेरणास्थान असल्याने अभ्यास होत गेला आणि यशही संपादन केले, असे मंडवे म्हणाले. 

अक्षय यांचे वडील मुख्याध्यापक असल्याने घरात लहानपणापासूनच शैक्षणिक वातावरण होते. पदवीचे शिक्षण घेत असताना मोठी बहीण "एमपीएससी'ची तयारी करीत होती. तिच्यापासूनही प्रेरणा घेत कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. कॉलेजमधील अभ्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात सलग तीन वर्षे अभ्यास केल्यावर यशोशिखरावर पोचल्याचे मंडवे यांनी सांगितले. दररोज आठ ते दहा तास नियमित अभ्यास केला. "हार्ड वर्क'पेक्षा "स्मार्ट वर्क'वर अधिक भर दिला. सोबतच आवडता छंद जोपासल्याने अभ्यासातही मन रमले. "एमपीएससी'ची तयारी करताना आधी "एसटीआय'साठी निवड झाली. सोबतच राज्यसेवेतही निवड झाल्याने हा मार्ग निवडला. माझ्या यशात वडील गणेश, आई सूर्यकांता, भाऊ, दोन बहिणींचा वाटा मोठा असल्याचे मंडवे म्हणाले. 

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com