
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे उद्घाटनाला उपस्थित राहू शकले नाहीत.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन; अध्यक्षांच्या खुर्चीत नारळीकरांचे रेखाचित्र
नाशिक - ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे उद्घाटनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत संमेलन अध्यक्षांची खुर्ची रिकामीच होती. त्या खुर्चीवर डॉक्टर जयंत नारळीकरांचे रेखाचित्र ठेवण्यात आले होते.
दरम्यान, संमेलनाचे मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. संमेलनाच्या उद्घाटनावेळी कादंबरीकार विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, जावेद अख्तर, मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, नागनाथ कोतापल्ले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील होते. याशिवाय डॉ.दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, कुंडलिक अतकरे, राजमाता शुभांगिनिराजे गायकवाड, विश्वास ठाकूर, जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते.
साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. 3 डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे मात्र उपस्थित राहू शकले नाहीत. संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. पण नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.
Web Title: Marathi Sahitya Sammelan 2021 Inaugration Jayant Narlikar Sketch In Chair
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..