
मुंबई- मराठी विषय खाजगी तसेच सरकारी शाळेत सक्तीचा करण्यात आला आहे. राज्य शासनाचे यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. मराठी विषयासाठी श्रेणी नाही तर थेट गुणांकन करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासनाचे मराठी भाषा सक्ती कडे पाऊल टाकल्याचं म्हणता येईल. याबताचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घ्यावीच लागणार आहे. या परीक्षेत मराठी विषयाला श्रेणी देऊन मूल्यांकन न करता मार्क्स देऊन मूल्यांकन केलं जाणार आहे. इतर माध्यमातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय गांभिर्याने शिकवला जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारकडून ही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 2025- 2026 या शैक्षणिक वर्षापासून या नव्या पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे.