
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मराठवाडा गॅझेटियर (१९६७) हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. तत्कालीन मराठवाड्याची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय स्थितीची तपशीलवार माहिती त्यात देण्यात आली आहे. गॅझेटियरमध्ये मराठवाड्यातील मराठ्यांचा ‘कुणबी’, असा उल्लेख आहे. मराठा समुदाय शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दर्जा अत्यंत मागासलेला होता, असे नमूद केले असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित अहवालानुसार, मराठा समुदायातील बहुतांश लोक शेती, मजुरी आणि इतर निम्न-दर्जाच्या व्यवसायांवर अवलंबून होते. त्या माहितीच्या आधारे मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांचे वाटप करावे, असा जोरदार आग्रह मंत्रिमंडळ उपसमितीतील काही सदस्यांनी धरला असल्याचे सांगण्यात येत आहे.