पावसाळ्यात २४ दिवस मोठे उधाण, १४५ गावांना धोका; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा
Monsoon 2026: महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने यंदा पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील १४५ गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. २४ दिवस मोठे उधाण येणार असून प्रशासनाकडून अलर्ट जारी केला आहे.
अलिबाग : चालू वर्षी पावसाळ्यात २४ दिवस समुद्राला मोठे उधाण येणार असून, या वेळी समुद्रकिनारपट्टीवर साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असून, समुद्र तसेच खाडीकिनारपट्टी भागात पाणी शिरण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.