
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या बोरिवली गावात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शोधमोहीम राबवत २२ ठिकाणी छापे घातले. दहा तासांच्या या कारवाईत संशयितांकडून मोबाईल फोन, तलवारी, मालमत्तांबाबतची कागदपत्रे आणि दहशतवादाला चिथावणी देणारी आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.