
मुंबई : ‘‘माथाडी कायदा रद्द होईल, अशा अफवा पसरवली जात आहे. मात्र त्यावर कोणी विश्वास ठेवू नये. माथाडी कामगार कायदा हा फक्त महाराष्ट्रात लागू आहे. त्यामुळे हा कायदा रद्द होणार नसून, सर्वांशी चर्चा करून त्यात सकारात्मक बदल करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सोमवारी दिली.