Shocking Robbery at Hill Station Matheran
sakal
कैलास म्हामले
कर्जत : रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये जबरी चोरीची धक्कादायक घटना घडली असून, त्यामुळे संपूर्ण माथेरानसह कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. घरात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी घरातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटून नेल्याचे उघड झाले आहे.