

सोलापूर : महापालिकेने मावा विक्रेता आणि खाण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम सुरू केली आहे. शहरातील पानटपरी परिसरातील माव्याचे लाल डाग धुवायला लावले. तर काही ठिकाणी थुंकणाऱ्याकडून रस्ता स्वच्छ करून घेतला. तसेच पानटपरीवर मावा विक्री होते का? याची तपासणी केली. सोमवारी शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ६९ जणांवर दंडात्मक कारवाई केली.