esakal | 'मावळचा गोळीबार गरजेचा होता हे न्यायाधीशांनी मान्य केलंय'
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad

'मावळचा गोळीबार गरजेचा होता हे न्यायाधीशांनी मान्य केलंय'

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: लखीमपूर खेरी (Lakhimpur kheri) येथे शेतकऱ्यांविरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद (Maharashtra bandh) पुकारण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी माध्यमांशी संवाद साधला. "अमानवीय कृत्याचं दु:ख होणं हे माणसुकीच दर्शन आहे. सत्तेची मग्रुरी आणि सत्तेचा माज हा त्या घटनेतून दिसतो. गोरगरीब शेतकरी रस्त्यावर उभा आहे आणि मागून येऊन जीप त्यांच्या अंगावर घालायची आणि नऊ जणांना चिरडून मारुन टाकायचं. त्याबद्दल वाईट वाटणार नसेल, तर तशी महाराष्ट्राती संस्कृती नाही" असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

"शेतकरी कुठलाही असो, शेवटी ते देशाचा शेतकरी आहे. देशासाठी अन्न पिकवतो. उत्तर प्रदेशात ज्या भागात हे घडलं, तिथे सर्वात जास्त गव्हाचं उत्पादन होतं. शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर होणार दु:ख दाखवायचं की नाही. तुमच्यालेखी शेतकऱ्यांची किंमत काय हेच यातून दिसते" अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी विरोधकांवर केली. "ज्यांना चिरडून मारलं, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केली असती, तर माणसुकी दिसली असती, जिवंतपणा दिसला असता" असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा: पोलिसाने केली पत्नीच्या प्रियकराची हत्या, मृतदेहाचे तुकडे भरले गोणीत

विद्यमान सत्ताधारी लखीमपूर खेरीचा मुद्दा उपस्थित करत असताना, देवेंद्र फडणवीसांनी मावळ गोळीबाराची आठवण करुन दिली. शेतकऱ्यांसोबत झालेली ही घटना खऱ्या अर्थाने जालियनवाला बाग हत्याकांड आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले. "मावळमध्ये घटना घडली त्याची चौकशी झाली आहे. चौकशीत गोळीबार कसा गरजेचा होता ते न्यायाधीशांनी मान्य केलं आहे. मावळचा गोळीबार पोलिसांनी केला. पोलिसांच्या हातातून बंदुका खेचून नेत्यांच्या मुलांनी गोळीबार केलेला नाही" असे आव्हाड म्हणाले.

loading image
go to top