MBA MMS CET Exam Result : एमबीए-एमएमएस सीईटीचा निकाल जाहीर; एकूण ८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) एप्रिलमध्ये घेतलेल्या एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीच्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर.
mba cet exam result

mba cet exam result

esakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) एप्रिलमध्ये घेतलेल्या मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) आणि मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीच्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ‘एमबीए-एमएमएस’च्या सीईटी परीक्षेत आठ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्यात, राज्यातील सहा आणि अन्य राज्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com