McDonald : मॅकडोनाल्डच्या पदार्थांमधून चीज झाले हद्दपार, FDA च्या कारवाईनंतर पदार्थांच्या नावात केलाय बदल

McDonald : खव्वयांच्या आवडीचा विषय असलेल्या ‘मॅकडोनाल्ड’ च्या साखळी रेस्टॉरंट्सवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) मोठी कारवाई करण्यात आली आहे.
McDonald
McDonaldesakal

McDonald : अनेक खव्वयांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे फास्टफूड होय. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज इत्यादी खाद्यपदार्थ खायला आवडतात. जर तुम्ही देखील फास्टफूड प्रेमी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

कारण, अनेक खव्वयांच्या आवडीचा विषय असलेल्या ‘मॅकडोनाल्ड’ च्या साखळी रेस्टॉरंट्सवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) मोठी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करण्यामागचे कारण म्हणजे, मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॉरंट्समध्ये बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये चीजचा वापर न करता, चीजसदृश्य पदार्थांचा वापर केलेला आढळून आला. ही बाब उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

हा सर्व प्रकार घडला तो अहमदनगर जिल्ह्यातील केडगावमध्ये. केडगाव येथील ‘मॅकडोनाल्ड’ च्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या विविध पदार्थांमध्ये चीजच्या ऐवजी चीजसदृश्य पदार्थ वापरला जात होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर अन्न व सुरक्षा आयुक्तांनी नेमलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी संबंधित मॅक्डोनाल्डच्या रेस्टॉरंटला कारणे दाखवा ही नोटीस बजावली होती.

मात्र, या रेस्टॉरंटने या नोटीसकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि चीजसदृश्य पदार्थांचा वापर तसाच चालू ठेवला होता. त्यामुळे, अन्न आणि औषध प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मॅक्डोनाल्डच्या या आऊटलेटवर गंभीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर, ही अन्न आणि सुरक्षा आयुक्तांच्या या आदेशाचे पालन न केल्यामुळे अखेरीस या पदार्थांची विक्री थांबवण्याचा गंभीर इशारा देण्यात आला.

त्यानंतर, मात्र, मॅकडोनाल्ड्स या रेस्टॉरंट्सची साखळी चालवणाऱ्या हार्डकॅसल रेस्टॉरंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नरमाईची भूमिका घेत, आपण या पदार्थांची नावे बदलल्याचे पत्र या अधिकाऱ्यांना दिले आहे.

मॅकडोनाल्‍ड्सचा खुलासा

“महाराष्ट्रातील मॅकडोनाल्‍ड्स स्टोअर्समधील आमच्या मेन्‍यूमधून 'चीज' हा शब्द काढून टाकल्याच्या अलीकडील अहवालांबाबत आम्ही आमच्या ग्राहकांना खात्री देऊ इच्छितो की आम्ही आमच्या सर्व उत्पादनांमध्ये फक्त शुद्ध (रिअल), दर्जेदार चीज वापरतो. आम्ही या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांसोबत सक्रियपणे काम करत आहोत. आमच्या घटकांमधील पारदर्शकतेप्रती आमची वचनबद्धता आणि आमच्या ग्राहकांना स्वादिष्ट, उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ देण्‍याप्रती समर्पितता अतूट आहे.” असं मॅकडोनाल्डकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, हा आदेश अहमदनगर या जिल्ह्यापुरताच मर्यादित असला तरी हा आदेश महाराष्ट्रातील मॅकडोनॉल्ड्सच्या सर्वच रेस्टॉरंटला लागू असणार आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली आहे. ज्या खाद्यपदार्थांमध्ये चीजचा उल्लेख होता. त्या पदार्थांमधून आता चीज हा शब्द हटवण्यात आला आहे.

पदार्थांची बदललेली नावे खालीलप्रमाणे :

  • व्हेज नजेट्स (पूर्वीचे नाव - चीझी नजेट्स)

  • नॉनव्हेज बर्गर (पूर्वीचे नाव - मॅक चीज नॉनव्हेज बर्गर)

  • व्हेज डिलाईट बर्गर (पूर्वीचे नाव - मॅक चीज व्हेज डिलाईट बर्गर)

  • अमेरिकन व्हेज बर्गर (पूर्वीचे नाव – कॉर्न अ‍ॅण्ड चीज बर्गर)

  • अमेरिकन नॉन-व्हेज बर्गर (पूर्वीचे नाव - ग्रील्ड चिकन अ‍ॅण्ड चीज बर्गर)

  • ब्लू बेरी केक (पूर्वीचे नाव - ब्लू बेरी चीज केक)

  • इटालियन व्हेज बर्गर (पूर्वीचे नाव - इटालियन चीज व्हेज बर्गर)

McDonald
Swiggy Account Hacked करून लाखोंचा गंडा, तुमच्यासोबतही होऊ शकतो प्रकार? | food Delivery app

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com