Measles Disease: आता गोवरसाठीही क्वारंटाईन सेंटर; टास्क फोर्सने दिले आदेश

गोवरची लागण झालेल्यांची संख्या 658 वर पोहोचली आहे.
Measles Disease
Measles Diseaseesakal

राज्यभरात कोरोनानंतर आता गोवरने थैमान घातलं आहे. गोवरची लागण झालेल्यांची संख्या 658 वर पोहोचली आहे. दरम्यान, आता गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत. (Measles Disease)

राज्यात गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रविवारी संशयित गोवर रुग्णांची संख्या 10 हजार 544 वर पोहोचली आहे. तब्बल तीन वर्षांपासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे संपूर्ण देशभरात पहिल्यांदा लॉकडाऊन लागल होत. आता पुन्हा क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहे.

Measles Disease
Sushma Andhare Vs Nitesh Rane: प्रिय नितू... तुझा अभ्यास फारच कच्चा आहे; सुषमा अंधारेंचं नितेश राणेंना पत्र

सध्या राज्यात गोवरच्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं लागण झालेल्यांना क्वारंटाईन करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

गोवरची लागण झालेल्या मुलांना किमान सात दिवसांसाठी विलगीकरणात ठेवावं, असे निर्देश टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत. यासाठी रुग्णालयीन व्यवस्था करण्याचे निर्देही टास्क फोर्सनं दिले आहेत.

तसेच, कुपोषित बालकांना गोवर आजाराची लागण झाली असेल, तर त्यांची अधिक काळजी घेणं आवश्यक असतं. अन्यथा त्यांच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून या बालकांना आवश्यक पोषण आणि जीवनसत्त्व 'अ'चा डोस द्यावा, असे निर्देशही टास्क फोर्सनं प्रशासनाला दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com