esakal | चिपी विमानतळ : मुख्यमंत्र्यांची केंद्रीयमंत्र्यासोबत आज महत्वपूर्ण बैठक I Chipi Airport
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचे (Chipi Airport Inauguration) उद्घाटन येत्या 9 ऑक्टोबरला होत आहे.

चिपी विमानतळ : मुख्यमंत्र्यांची केंद्रीयमंत्र्यासोबत आज महत्वपूर्ण बैठक

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचे (Chipi Airport Inauguration) उद्घाटन येत्या 9 ऑक्टोबरला होत आहे. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister Jyotiraditya Scindia) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार असून याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बैठक होणार असल्याचे समजतेय. केंद्रीय मंत्री सिंधिया यांच्यासोबत दुपारी 3.30 वाजता ही बैठक होणार आहे. याला मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडूनही दुजारा मिळाला असून ही विमानतळाबाबत बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे.

याशिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे दोन्ही नेते या निमित्तानं एकाच व्यासपीठावर येणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरील नावांची माहिती दिली आहे. सध्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाआधीच शिवसेना व भाजपात श्रेयाची लढाई सुरू आहे.

हेही वाचा: काँग्रेसमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही; केरळात बड्या नेत्याचा राजीनामा

चिपी विमानतळासाठी शिवसेनेनं संसदेत अनेकदा पाठपुरावा केल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय, तर आमच्या पाठपुराव्यामुळं व केंद्र सरकारच्या प्रयत्नांतूनच हे विमानतळ सुरू होत असल्याचा भाजपचा व नारायण राणे यांचा दावा आहे. चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव आहे.

हेही वाचा: 'जरंडेश्वर'ची पवार कुटुंबीयांकडून पळवा-पळवी करून लपवा छपवी'

loading image
go to top