Maharashtra Politics | सत्तासंघर्षांनंतर पहिल्यांदाच होणार महाविकास आघाडीची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

meeting of mahavikas aghadi on september 29 in the presence of sharad pawar

Maharashtra Politics सत्तासंघर्षांनंतर पहिल्यांदाच होणार महाविकास आघाडीची बैठक

राज्यात सत्तासंघर्षांनंतर महाविकास आघाडीची पहिल्यांदाच बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुंबईत येत्या २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीला पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , काँग्रेसचे विधीमंडळातील नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे महत्वाचे नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय घडते, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.(meeting of mahavikas aghadi on september 29 in the presence of sharad pawar)

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर चर्चा करण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाविकास आघाडीची महत्वाची बैठक येत्या २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीला शरद पवार माजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील महत्वाचे नेतेही या बैठकीला हजेरी लावणार आहेत.

शिवसेनेतील बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून महाविकास आघाडीची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत झाली नव्हती. या अगोदर मागील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधीमंडळात बैठक झाली होती. मात्र, आता पवार, ठाकरे आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्व असणार आहे.

Web Title: Meeting Of Mahavikas Aghadi On September 29 In The Presence Of Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..