परतीच्या मॉन्सूनसाठी पोषक वातावरण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

कोकण, मराठवाडा व विदर्भात संपूर्ण मॉन्सून व्यापल्यानंतर जूननंतर उत्तरेकडे कूच केली होती.अवघ्या दहा दिवसात मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापून बारा दिवस आधीच वायव्य भागात जूनमध्ये दाखल झाला होता.

पुणे - वेळेच्या आधीच यंदा उत्तर भारतात दाखल झालेले नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. सोमवारपासून (ता. २८) हा प्रवास सुरू होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पश्‍चिम राजस्थानच्या भागातून मॉन्सून परतीचा प्रवास सुरू होईल. यंदा मेपासून मॉन्सूनचा सुरू झालेला प्रवास फारसा न अडखळता वेगाने पुढे सरकत राहिला होता. केरळमध्ये एक जून रोजी दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात जूनला हजेरी लावली. त्यानंतर मराठवाड्यातील दक्षिण भागातून उत्तरेकडे सरकून प्रवास वेगाने सुरू झाला होता.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात संपूर्ण मॉन्सून व्यापल्यानंतर जूननंतर उत्तरेकडे कूच केली होती. अवघ्या दहा दिवसात मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापून बारा दिवस आधीच वायव्य भागात जूनमध्ये दाखल झाला होता. राज्यासह, देशातील बहुसंख्य भागात समाधानकारक पाऊस पडला. जम्मू काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, ईशान्य भारतातील नागालॅंड, मणिपूर, मिझोराम या राज्यांत सर्वत्र चांगला पाऊस झाला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशी आहे स्थिती
मॉन्सूनचा परतीचा प्रवास एक सप्टेंबरपासून सुरू होतो
हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ 
सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होणे अपेक्षित
काही प्रमाणात हा प्रवास लांबला
दहा ते बारा दिवस उलटूनही वारे फिरले नव्हते
आता राजस्थानात पोषक वातावरण तयार 
राज्यातही दोन ते तीन दिवसांपासून पावसाची विश्रांती

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meteorological department has forecast a favorable environment for the return monsoon