घाट माथ्यावर 48 तासांत मुसळधार पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

बंगालच्या उपसागरात 19ऑगस्ट दरम्यान आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 20ऑगस्टपासून राज्यात मॉन्सूनचा प्रभाव पुन्हा सक्रिय होईल,अशी माहिती डॉ. अनुपम काश्‍यपी यांनी दिली.

पुणे -  राज्यात येत्या 48 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा, तर पुढील पाच दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्‍यता असून, याचा परिणाम राज्याच्या वातावरणावर होणार आहे. 

दरम्यान, पुणे शहर व परिसरात रविवारी सकाळपासूनच पावसाच्या हलक्‍या ते मध्यम सरी पडल्या. पुढील पाच दिवस शहर व परिसरात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. बंगालच्या उपसागरात 19 ऑगस्ट दरम्यान आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 20 ऑगस्टपासून राज्यात मॉन्सूनचा प्रभाव पुन्हा सक्रिय होईल, अशी माहिती हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुढील पाच दिवस 

  • राज्यात बहुतांश भागांत जोराचा पाऊस 
  • विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार 
  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात जोरदार सरी 
  • यगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meteorological department warned of heavy rains in most parts of the state