

Official Announcement: SPPU Declares Exam Dates for 41st Maharashtra-Goa MH-SET
पुणे : राज्यासह गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक आणि बहुप्रतिक्षेत असणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या (सेट) तारखा जाहीर झाल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ जुलै रोजी होणार आहे. विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे ४१ वी सेट परीक्षा आयोजित केली असून या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या मंगळवारपासून (ता. २) सुरू होत आहे.