MH Weather Update : राज्यात आज मुसळधार; उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होणार? - IMD | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

मागील २४ तासांपासून काही भाागांत पावसाची संततधार आहे.

राज्यात आज मुसळधार; उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होणार?

लक्षव्दीप, मालदीवजवळ चक्रीवादाळाच्या पट्ट्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. (heavy rain) याठिकाणी सुरु झालेल्या द्रोणीय भागामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणात याचा प्रभाव जाणवत आहे. परिणामी कालपासून राज्यातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह काही प्रदेशात पाऊस सुरु आहे. मागील २४ तासांपासून या भाागांत पावसाची संततधार आहे. आता पुन्हा एकदा आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र उद्यापासून (गुरुवार) महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, काल हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील पालघर, नंदुरबार धुळे या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस सुरु आहे. (Maharashtra Rain)त्यामुळे या प्रदेशातील ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान होत आहे. या वातावरणामुळे भारतीय हवामान खात्याने किनारपट्टीवरील लोकांना आणि मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला होता. आज सकाळपासून मुंबईध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गेले काही दिवस दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी राज्यातील काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही प्रदेशात येलो आणि काही भागात ओरेंज अर्लटचा हवामान खात्याने इशारा दिला होता.

टॅग्स :Mumbai News