म्हाडाच्या ५६४७ सदनिकांची आज Online सोडत; कोणाचं गृहस्वप्न होणार साकार?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

म्हाडाची राज्यातील २२ वी लाॅटरी असून कुणाचं गृहस्वप्न साकारणार? हे आज उडगडणार आहे. १ लाख १३ हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. यामध्ये ९२ हजार पेक्षा जास्त लोकांनी पैसै भरले आहे. ९८ कोटी डिपाॅजिटमधून मिळाले. ज्यांना लाॅटरी लागली नाही त्यांना ३ दिवसात पैसे परत केले जाणार आहेत.

पुणे :  पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) कार्यक्षेत्रातील पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाच हजार ६४७ सदनिका विक्रीसाठी ऑनलाइन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज होणार आहे. म्हाडाच्या Online सोडतीचा कार्यक्रमासाठी नेहरू मेमोरियल हॉल येथे पवार दाखल झाले आहेत.

म्हाडाची राज्यातील २२ वी लाॅटरी असून कुणाचं गृहस्वप्न साकारणार? हे आज उलगडणार आहे. १ लाख १३ हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. यामध्ये ९२ हजार पेक्षा जास्त लोकांनी पैसै भरले आहे. ९८ कोटी डिपाॅजिटमधून मिळाले. ज्यांना लाॅटरी लागली नाही त्यांना ३ दिवसात पैसे परत केले जाणार आहेत.

यावेळी अजित पवार यांनी सीरम दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ''गरीब, मध्यमवर्गीयांनाही घर मिळावं म्हणून म्हाडाने ही योजना राबवलेली आहे. म्हाडाचा व्यवहार भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आहे. कोणी पैसे घेवून घर मिळवून देतो म्हटलं तर पोलिसांत तक्रार करा. आपल्याला ही पारदर्शकता टिकवायची आहे.असेही पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

म्हाडाच्या Online सोडतीबाबत अधिक माहितीसाठी क्लिक करा

प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे (चाकण) येथे ५१४, तळेगाव दाभाडे येथे २९६, सोलापूर जिल्ह्यात गट क्रमांक २३८/१, २३९ करमाळा येथे ७७ आणि सांगली येथे सर्व्हे क्रमांक २१५/३ येथे ७४ सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. पुणे जिल्ह्यातील मोरवाडी पिंपरी येथे ८७, पिंपरी वाघेरे येथे ९९२ सदनिका आहेत. सांगली येथे १२९ सदनिका आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे येथे एक हजार ८८०, दिवे येथे १४ तर सासवड येथे चार सदनिका आहेत. सोलापूर जिल्ह्यात ८२ सदनिका आहेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात ४१०, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात एक हजार २० आणि कोल्हापूर महापालिका येथे ६८ सदनिका आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MHADA lottery for 5647 homes will withdraw today by ajit pawar