
Sangameshwar: राज्यसरकारने निवडणुकीच्या तोंडावर दुधाला सात रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर केले होते. मात्र त्या अनुदानाची मुदत दोनच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरअखेरच संपला आहे.
याबाबत राज्याचे दुग्ध विकास व्यवसाय विभागाच्या आयुक्त प्रशांत मोहोड यांनी ‘निर्णय नोव्हेंबरअखेरपर्यंतचा’ होता असे रविवारी (ता.१) स्पष्ट केले. निवडणुकीपुरती बोळवण झाल्याने दूध उत्पादक अस्वस्थ झाले असून त्यांनी नव्या सरकारकडून चांगल्या दराची अपेक्षा व्यक्त केली आहे.