esakal | #MahaConclave: अर्थराज्यमंत्र्यांनी समजवला 'जॅम'चा अर्थ
sakal

बोलून बातमी शोधा

bhagwat karad

#MahaConclave: "गरीबांमध्ये थेट लाभाचे वितरण होण्यासाठी प्रयत्नशील" - अर्थराज्यमंत्री

sakal_logo
By
ओमकार वाबळे

देशात सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच सहकार क्षेत्राबद्दल महापरिषद पार पडत आहे. 'सकाळ' समूहाच्या पुढाकाराने पार पडणाऱ्या या परिषदेला सहकार बँकिंग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी उपस्थिती लावली. सहकार क्षेत्रातील धोरणात्मक विषयांवर चर्चा यावेळी झाली.

सहकारी वित्तीय संस्थांच्या प्रश्नांवर परिषदेत चर्चा करून सर्व मुद्दे आणि प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवा, असे डॉ. कराड म्हणाले. यासंदर्भात दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॅम (JAM) या संज्ञेचा अर्थही समजावून सांगितला. गरीबांमध्ये थेट लाभाचं वितरण (थेट लाभ हस्तांतरण: डीबीटी) करण्यासाठी या संकल्पनेचा उपयोग होणार असल्याचं कराड म्हणाले.

J: Jan-dhan account

A: Aadhar account

M: Mobile

loading image
go to top