'हिंदू राष्ट्र झाल्यास घरच्या घरी हत्यारं बनवणार'; Jitendra Awhad म्हणाले..

Jitendra Awhad
Jitendra Awhadesakal
Summary

'भारत हिंदू राष्ट्र झाल्यास घरच्या घरी आम्ही हत्यारं बनवणार आहोत.'

भारताला हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) बनवण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्ही आमचं संघटन मजबूत करत आहोत. भारत हिंदू राष्ट्र झाल्यास घरच्या घरी आम्ही हत्यारं बनवणार आहोत, तीही चांगल्या चांगल्या मंत्रांनी बनलेली हत्यारं आमच्याकडं असतील आणि इथं भारतात बसूनच आम्ही अफगानिस्तानच्या (Afghanistan) शत्रूंना ठार करु, असा इशारा एका हिंदू महाराजानं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिलाय.

या मुलाखतीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकांऊंटवर शेअर करत महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी 'या जोकरांच्या हाती आपला देश सुरक्षित आहे, असं म्हणत त्यांनी टीका केलीय. अफगानिस्तानच्या शत्रूंना ठार करुन आम्ही तिथल्या जनतेला वाचवू, असं त्या महाराजानं म्हंटलंय. 'जेव्हा एक मुस्लीम मुलगी पीईसी कॉलेजमध्ये आली, तेव्हा तिला अनेक विद्यार्थ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्यांनी भगव्या रंगाचं उपरणं अंगावर घेतल्याचं दिसतंय. हे तथाकथित भक्त भारताचा पाकिस्तान करून सोडणार आहेत. हे राम," अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरूनही (Karnataka Hijab Case) टीका केली होती.

Jitendra Awhad
Tejasvi Surya घराणेशाहीवर बोलताच Supriya Sule संतापल्या

'हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या वेगळ्या गोष्टी नाहीत, हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे. देशामध्ये बंधुभाव, विविधतेतील एकता आज सुद्धा टिकून आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच येत नाही, तुम्ही मान्य करा अथवा नका मान्य करून पण भारत हिंदू राष्ट्रच आहे', असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनीही केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com