
या निकालानंतर आमचं लक्ष आता महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेकडं आहे.
सगळ्यांना पुरुन उरलोय अन् केंद्रापर्यंत पोचलोय : नारायण राणे
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर (Sindhudurg District Bank Election) भाजपनं (BJP) 11, तर महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) 8 जागेवर विजय मिळवलाय. ह्या विजयानं मंत्री नारायण राणे (Narayan Rane) याचं सिंधुदुर्गातील वर्चस्व पु्न्हा एकदा सिध्द झालंय. या निकालानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री राणे यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका केलीय. ते सिंधुदुर्गातील त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.
राणे म्हणाले, या निकालानंतर आमचं लक्ष आता महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेकडं आहे. महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री नसल्यानं वाताहत झालीय, त्यामुळं राज्यात भाजपची सत्ता आणणं अपेक्षित आहे आणि त्यादृष्टीनं आमची वाटचाल सुरुय. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा (Bharatiya Janata Party) मुख्यमंत्री हवाय, 'लगान'ची टीम नकोय. आजवर अनेकांनी माझं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला; पण मी सगळ्यांना पुरुन उरलोय आणि केंद्रापर्यंत पोहचलोय, असा थेट घणाघातही त्यांनी महाविकास आघाडीवर केलाय.
हेही वाचा: राज्याला भाजपचा मुख्यमंत्री हवाय, 'लगान'ची टीम नको : राणे
नितेश राणेंच्या (Nitesh Rane) पोस्टरबाबत विचारलेल्या प्रश्नावर राणेंनी संताप व्यक्त करत, यांची लायकी पोस्टर लावण्याचीच आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. सिंधुदुर्गातील (Sindhudurg) भाजपचा विजय हा जनतेचा विजय आहे. नितेशच्या प्रयत्नांचा हा विजय असल्याचंही त्यांनी सांगितलं. तीन पक्ष एकत्र असून देखील त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतंय, हीच खरी भाजपची ताकद आहे, असंही ते म्हणाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला असून प्रमुख उमेदवार बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडं नारायण राणे (Narayan Rane) गटाचे प्रमुख उमेदवार राजन तेली यांना महाविकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक यांनी पराभवाचा धक्का दिलाय. तेलींच्या पराभवामुळं राणे गटाला जबर धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. मात्र, असं जरी असली तरी सिंधुदुर्ग बँकेवर राणे गटानं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय.
हेही वाचा: नितेश राणेंच्या बॅनर बाजीनंतर प्रसाद लाड भडकले, म्हणाले...
Web Title: Minister Narayan Rane Criticizes Mahavikas Aghadi Government Over Sindhudurg District Bank Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..