पश्चिम महाराष्ट्रानं 'मेट्रो प्रकल्प' हाती घ्यावा

Nitin Gadkari
Nitin Gadkariesakal

सातारा : पुणे शहरात तीन मजली उड्डाणपूल बांधत आहोत. सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या खासदार, आमदारांनी एक बैठक बोलवावी व आमच्या अधिकाऱ्यांना आराखडा द्यावा. या भागातील एकही रस्ता महापुरात बुडणार नाही, असा आपण बांधू. त्याचबरोबर पुणे ते बेंगळूर हा नवा महामार्ग आपण तयार करत आहोत. उत्तर भारतातून येणारी वाहतूक मुंबई, सातारा, पुण्याकडे जाते. सुरत, नाशिक, अहमदनगर, तामिळनाडू असा रस्ता करण्याचा प्रकल्प करत आहोत. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते अहमदनगर, पुणे ते सोलापूर असा मेट्रो प्रकल्प (Metro Project) राबवण्याचा आमचा विचार सुरु आहे. ही मेट्रो युरोपियन मेट्रोसारखी (European Metro) असेल. तिचे स्पीड ताशी १४० असेल. त्यामुळे पुणे ते कोल्हापूर केवळ पावणेतीन तासात जाईल. हा प्रकल्प दिशादर्शक असाच असेल, असे स्पष्ट मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले.

Summary

पुणे-कोल्हापूर, पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर असा मेट्रो प्रकल्प (Metro Project) राबवण्याचा आमचा विचार सुरुय.

कराड येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुमारे सहा हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी मंत्री गडकरी बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले, कोल्हापूर ते सांगली रस्त्याचे काम येत्या सहा महिन्यात आपण सुरू करणार आहोत. तसेच पुणे ते बंगळूर नवा महामार्ग तयार आता करत आहोत. उत्तर भारतातून येणारी वाहतूक मुंबई, सातारा, पुण्याकडे जाते. सुरत, नाशिक, अहमदनगर, तामिळनाडू असा रस्ता करण्याचा प्रकल्प करतो आहोत. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते अहमदनगर, पुणे ते सोलापूर असा मेट्रो प्रकल्प आपण राबवण्याचा विचार करत आहोत. ही मेट्रो युरोपियन मेट्रोसारखी असेल. तिचे स्पीड ताशी १४० असेल, असे त्यांनी सांगितले.

Nitin Gadkari
नेता असावा तर असा! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा घरी जावून गडकरींकडून 'सन्मान'

सातारा-पुणे महामार्गाची लवकरच होणार दुरुस्ती

सातारा ते पुणे महामार्गाची (NH4) अतिशय दयनीय अवस्था झालीय. या महामार्गावरून प्रवास करणे वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लावणारे आहे. अपघात आणि दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग आणि सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि सातारा जिल्हावासियांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलीय. मंत्री गडकरी आज कराड दौऱ्यावर आले असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची भेट घेतली आणि महामार्ग दुरुस्तीसंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. सातारा ते पुणे महामार्गावर सर्वत्र खड्डे पडले असून वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतोय. निकृष्ट काम झाल्याने अगदी सुरुवातीपासूनच महामार्गाची आणि सेवा रस्त्यांची मोठ्याप्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. महामार्ग आणि सेवा रस्त्यांच्या कामाबाबत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधीत ठेकेदार यांना अनेकदा सूचना करुनही कोणतीही कार्यवाही होत नाही. महामार्गाची अक्षरश: चाळण झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. दररोज अनेक छोटेमोठे अपघात घडत असून अनेकजण जायबंदी होतात तर, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, गडकरी यांनी शिवेंद्रसिंहराजेंना आश्वासन देताना सांगितले, की येत्या तीन ते चार महिन्यात सातारा ते पुणे महामार्गाची दुरुस्ती करुन आपला प्रश्न सोडविला जाईल, अशी ग्वाही दिली.

Nitin Gadkari
'कारखानदारांनो, साखर-साखर करत राहिलात, तर भीक मागायची वेळ येईल'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com