esakal | राज्यातील पोलिस निवासस्थानासाठी आठशे कोटींची तरतूद: शंभुराजे देसाई; Shambhuraj Desai
sakal

बोलून बातमी शोधा

शंभुराजे देसाई

''राज्यातील पोलिस निवासस्थानासाठी आठशे कोटींची तरतूद''

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: राज्यातील पोलिसांच्या निवासस्थानासाठी आघाडी सरकाने अर्थसंकल्पात ८०० कोटींची तरतूद केली आहे. यातून अग्रक्रमाने ग्रामीण आणि डोंगरी भागातील पोलिस ठाणी व निवासस्थाने पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai)यांनी सांगितले. ते(दि.१२ मंगळवारी) अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी (Ambabai Temple kolhapur)आले होते. त्यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यातील पोलिसांच्या निवासस्थानांचा आणि ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांचा प्रश्न अनेक दिवस रखडलेला आहे. युती सरकारने २०१९-२०१९ या वर्षामध्ये निवसास्थानांसाठी फक्त २५० कोटींची तरतुद केली होती; मात्र आघाडी सरकाने २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात याकामासाठी तब्बल ८०० कोटींची तरतुद केली आहे. यातून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला मार्गी लावला जाईल असे गृहमंत्री देसाई यांनी सांगितले.

देसाई म्हणाले, ‘‘श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मितीचा प्रस्ताव आला असेल तर त्यावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून विचार करू. अपुऱ्या मनुष्यबळाचीही प्रश्न भरती प्रक्रियेतून सोडविला जाईल. महाराष्ट्र हे कर्नाटक व गोवा या दोन राज्यांची हद्द असल्याचे तेथून दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. या हद्दीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने कारवाईसाठी अनेकवेळा पोलिसांचीही मदत घेतली जाते. तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना नव्या मोटारी दिल्या आहेत. तस्करीचे चोरटे मार्ग शोधून कारवाई करण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत.’’

loading image
go to top