esakal | 'मोदी सर्व आघाड्यांवर फेल, ट्विटर इंडियावरील छापेमारीपेक्षा कोविड मॅनेजमेंटकडे लक्ष द्या'
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व आघाड्यांवर फेल आहेत. त्यामुळे दररोज हेडलाइन मॅनेजमेंटचा सहारा घेत आहेत, असा घणाघात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

'मोदी सर्व आघाड्यांवर फेल, ट्विटर इंडियावरील छापेमारीपेक्षा कोविड मॅनेजमेंटकडे लक्ष द्या'

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : ट्विटर इंडियाच्या कार्यालयावर छापेमारीपेक्षा (raid on twitter india) केंद्र सरकारने तिच शक्ती ऑक्सिजन, औषधे व कोविड मॅनेजमेंटवर लावली असती तर गंगेच्या किनाऱ्यावर दफनविधी तसेच गंगेत इतके शव वाहताना पाहावे लागले नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) हे सर्व आघाड्यांवर फेल आहेत. त्यामुळे दररोज हेडलाइन मॅनेजमेंटचा सहारा घेत आहेत, असा घणाघात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (minister yashomati thakur) यांनी केला आहे. सोमवारी दिल्लीतील ट्विटर इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली. यावरूनच त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. (minister yashomati thakur criticized pm modi on twitter india raid issue)

हेही वाचा: बावनकुळेंची धडपड कशासाठी? 'त्या' रिक्त जागेसाठी भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात

भाजपचे नेते संबित पात्रा यांनी काही दिवसांपूर्वी टूलकिटप्रकरणी काँग्रेसवर आरोप केले होते. यावरून वादळ उठले असताना मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी काँग्रेसप्रणित टूलकिट टॅ बनविल्याचा आरोप पात्रा यांनी ट्विटरवर केला होता. याविरोधात दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाला स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस पाठविली आहे. ही नोटीस देण्यासाठी दिल्ली पोलिसांची टीम ट्विटर इंडियाच्या कार्यालयात पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

छाप्याने सत्त बदलत नसते - वडेट्टीवार

ट्विटर इंडियाच्या कार्यालयावर झालेल्या छापेमारीप्रकरणी विजय वडेट्टीवारांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. २०२४ मध्ये ट्विटर इंडियावरील प्रोफाईल पिक्चर बदलत असल्याची स्पष्ट चाहूल लागल्यानेच त्यांच्या कार्यालावर छापा पडलेला आहे. पण छाप्याने सत्य बदलत नसते हे २०२४ ला 'जुमला छाप' ला कळेल, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.

loading image