
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजप आघाडी व कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येऊन केलेल्या महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना सुरु आहे. अध्यक्ष निवडणूकीत कशी रणनिती आघायची यासाठी भाजप व महाविकास आघाडीमध्ये मंगळवारी सकाळपासून बैठका सुरु आहेत. दरम्यान माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भाजपचाच अध्यक्ष होईल असा दावा केला आहे. तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी "चमत्कार घडणार' असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नेमका काय चमत्कार घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्हा जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये भाजपसह इतरांनी एकत्र येऊन अध्यक्षपदासाठी करमाळ्यातील केम गटाचे सदस्य अनिरुद्ध कांबळे यांना अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यांनी अर्जही दाखल केला आहे. याबरोबर महाविकास आघाडीनेही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला असून नेमका कोण अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाची बैठक देशमुख यांच्या निवास्थानी झाली. यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहीते पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार यासह इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडीची बैठक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या निवास्थानी झाली. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना फक्त "चमक्तार घडणार' एवढेच वक्तव्य केले. त्यामुळे नेमका काय चमत्कार घडणार हे समजले नाही. अध्यक्ष निवडणूकीसाठी अवघा काही कालावधी शिल्क राहिलेला असताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे देशमुख यांनी भाजपचाच अध्यक्ष होणार असा दावा "सकाळ'शी बोलताना केला आहे.
मंगळवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात भाजपकडून माजी पालकमंत्री देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, अनिरुद्ध कांबळे यासह इतर प्रमुख कार्यकर्ते होते. महाविकास आघाडीकडून अर्ज भरण्यासाठी जिल्हा परिषदेचे विक्रांत पाटील उर्फ बाळराजे पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.