सोलापूर - यंदाचा खरीप हंगाम सध्या सुरू झाला असून १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी ४६ लाख ८२ हजार टन खत आवश्यक आहे. पण, सध्या त्यातील २५ लाख ५३ हजार टन खत उपलब्ध आहे. खतांचा तुटवडा भासू शकतो म्हणून अनेकांनी आतापासूनच खतांचा साठा करून ठेवायला सुरवात केली आहे. त्यातच तीन मिश्र खतांच्या प्रत्येक बॅगची किंमत गतवर्षीपेक्षा यंदा २०० ते २५० रुपयांनी वाढली आहे.