टीईटी घोटाळा प्रकरणावर अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

mla abdul sattar on daughters name in tet exam scam in maharashtra
mla abdul sattar on daughters name in tet exam scam in maharashtra esakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) घोटाळा प्रकरणात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली व एका मुलाचे नावं समोर आले आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांच्या मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. दरम्यान याप्रकरणी आमदार अब्दुल सत्तारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

टीईटी परीक्ष न देता देखील यादीत नावे आली असून यादीत नावे टाकली त्यांच्यावर कारवाई करा, या प्रकरणाची सत्यता पडताळली पाहीजे असे सत्तार म्हणालेत. माध्यमाशी बोलताना एकनाथ शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, माझ्याकडे काल दुपारी साडे अकरा वाजता यादी आली, त्यानंतर मी स्पष्टीकरण दिलं की कोणीतरी खोटी बातमी चालवत आहे. कोणीतरी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यावर कायदेशीर कारवाई मी करणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. कायद्यानुसार त्यामध्ये काही चूक असेल तर त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होईल, असेही ते म्हणाले. या प्रकरणात माझ्या परिवाराची चूक असेल किंवा मी फायदा घेतला असेल, तर मी गुन्हेगार आहे. मात्र या यादीमध्ये ज्यांनी नावे टाकली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असे देखील सत्तार यावेळी म्हणाले.

mla abdul sattar on daughters name in tet exam scam in maharashtra
TET परीक्षा घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलांचं नाव, माजी मंत्र्यांनी आरोप नाकारले

सरकार माझं नाहीये, मी सरकारमध्ये एक आहे, मी मुख्यमंत्र, मंत्री किंवा पंतप्रधान कार्यालयातील कोणी अधिकारी असतो तर स्पष्टीकरण दिलं असतं, मी २८६ पैकी एक साधा आमदार आहे. त्यामुळे मला जे कळतं ते स्पष्टीकरण मी दिलं. याच्या व्यतिरीक्त तुमच्याकडे यापेक्षा जास्त माहिती असेल तर त्यांनी द्यायला पाहिजे असे प्रतुत्तर त्यांनी विरोधकांना दिलं. मी व्हॉट्सअॅपवर आल्यानंतर याला वाचा फोडली, स्पष्टीकरण दिलं असे सत्तार म्हणाले.

याचा खुलासा देशाची सर्वोच्च संस्था याचा खुलासा करेल, माझ्या परिवाराच्या लोकांनी अपात्र म्हणून आल्यानंतर पात्र म्हणून काही फायदा घेतला असेल तर माझ्या मुलींवर कारवाई केली जावी, नसेल घेतला तर ज्यांनी नाव टाकलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे असे सत्तार यावेळी म्हणाले.

परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून 2020 मध्ये त्या अपात्र आहेत सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे.

mla abdul sattar on daughters name in tet exam scam in maharashtra
हातात छत्री तरीही पावसात भिजले रोहित पवार; फोटो व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.