Bacchu Kadu Accident : आमदार बच्चू कडू यांचा अपघात; डोक्याला गंभीर दुखापत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bacchu Kadu

Bacchu Kadu Accident : आमदार बच्चू कडू यांचा अपघात; डोक्याला गंभीर दुखापत

अमरावतीत आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीच्या खासगी रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर उजव्या पायाला दुखापत झाली आहे.

रस्ता ओलंडत असताना हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. आज अमरावती शहरात सकाळी सहा ते साडेसहा च्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली आहे. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू रोडच्या दुभाजकावर जोरदार आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याची माहिती आहे.

हेही वाचा: JEE Exam : आता 75 टक्के मार्कांची अट नाही; शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

टॅग्स :Bacchu Kaduaccident